

पुढारी ऑनलाईन डेस्क : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा 'स्माइल अॅम्बेसेडर' म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून त्यांची "स्माइल अॅम्बेसेडर" म्हणून नियुक्ती करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
स्वच्छ मुख अभियान (क्लीन माउथ मिशन), ज्याला SMA असे संक्षिप्त रूप दिले आहे. हे भारतीय दंत संघटनेने (IDA) तोंडाचे आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी आणि चांगल्या मौखिक स्वच्छतेचे महत्त्व भारतीयांना शिक्षित करण्यासाठी एक राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे.
हेही वाचा :