Stock Market Updates | जागतिक संकेत सकारात्मक! सेन्सेक्स पुन्हा ६२ हजारांवर, अदानींच्या ‘या’ शेअर्सची कमाल | पुढारी

Stock Market Updates | जागतिक संकेत सकारात्मक! सेन्सेक्स पुन्हा ६२ हजारांवर, अदानींच्या 'या' शेअर्सची कमाल

पुढारी ऑनलाईन : जागतिक गुंतवणूकदारांनी अमेरिकेतील कर्ज मर्यादा वाटाघाटीच्या सकारात्मक संकेतांमु‍ळे सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी सुरु ठेवली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी आज मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी वधारले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने सुमारे २०० हून अधिक अंकांनी वाढून ६२,१०० वर एकदा झेप घेतली. तर निफ्टी १८,३०० वर होता. (Stock Market Updates)

निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा (Adani Enterprises Ltd) शेअर टॉप गेनर आहे. हा शेअर १० टक्के वाढून २,५५८ रुपयांवर पोहोचला. अदानी पोर्ट्स (Adani Ports & Special Economic Zone) चा शेअर साडेसहा टक्क्यांहून अधिक वाढून ७७८ रुपयांवर आहे. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉ‍वर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही हे शेअर्सही वाढले आहेत.

निफ्टीवर बीपीसीएल, ब्रिटानिया, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्सदेखील टॉपवर होते. तर अपोलो हॉस्पिटल, कोटक महिंद्रा बँक हे शेअर्स घसरले आहेत.

जागतिक बाजारातील स्थिती

अमेरिकेतील नॅस्डॅक कंपोझिटने (Nasdaq Composite) सोमवारी नऊ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर गाठली. तर S&P देखील वधारून बंद झाला. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ९ मे नंतरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. हा निर्देशांक सुमारे ०.३ टक्के वाढला आहे. जपानच्या निक्केईने (Japan’s Nikkei) नवव्या सत्रात तेजी कायम ठेवली आहे.

दरम्यान, गेल्या आठ सत्रांपैकी सात सत्रांमध्ये घसरलेला भारतीय रुपया आज सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २ पैशांनी वाढून ८२.८२ वर पोहोचला.

 हे ही वाचा :

Back to top button