पुढारी ऑनलाईन डेस्क : Stock Market Closing Position : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज सपाट झाली. त्यानंतर बाजारात आज सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र, तरीही बाजार हिरव्या रंगातच खेळत राहिला. शेवटच्या सत्रात मार्केटने पुन्हा थोडी तेजी जाणवत होती. NSE निफ्टी 50 111 अंकांनी किंवा 0.61% वाढून 18,314.40 वर आणि BSE सेन्सेक्स 234 अंकांनी किंवा 0.38% ने वाढून 61,963.68 वर पोहोचला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, बँक निफ्टी 84.30 अंकांनी किंवा 0.19% घसरून 43,885.10 वर आणि निफ्टी आयटी 703.65 अंकांनी किंवा 2.49% ने वाढून 29,007.30 वर पोहोचला.
भारतीय शेअर बाजारात आज निफ्टीला अदानी कंपन्यांच्या शेअर्सनी मोठा आधार दिला. अदानी कंपन्यांच्या शेअर्समुळे निफ्टी 50 वर 18300 वर ढकलले. अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी पोर्ट्स यांचे समभाग निफ्टीवर तब्बल 15 टक्क्यापर्यंत वाढले. त्यामुळे सपाट सुरुवात झालेल्या आजच्या भारतीय बाजारात अदानी समूहाचे शेअर्स 'रॉकस्टार' ठरलेत, असे म्हणता येऊ शकते.
अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब, सन फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे सर्वाधिक नफा मिळवणारे होते तर आयशर मोटर्स, यूपीएल, टाटा कंझ्युमर्स, हिंदाल्को आणि इंडसइंड बँक हे नुकसानीत होते. याशिवाय पॉवर ग्रिड, एनटीपीसीच्या समभागांच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढले. तर झोमॅटोचे शेअर्स 1 टक्क्याने वाढले.
बँक निफ्टी 86.80 अंकांनी किंवा 0.20% घसरून 43,882.60 वर आला. पीएनबी, बंधन बँक, एसबीआयएन, एयू बँक आणि कोटक बँक हे सर्वाधिक लाभधारक होते तर बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इंडसइंड बँक हे नुकसानीत होते.
डीपी वायर्स, सेया इंडस्ट्रीज, नीलकमल, निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स, थंगामाईल ज्वेलरी, राज रेयॉन इंडस्ट्रीज, बालाजी अमाइन्स, नारायणा हृदयालय लि., आर्चीज, ग्लँड फार्मा, फिनोटेक्स केमिकल, यूकल फ्युएल सिस्टम्स, शेअर इंडिया सिक्युरिटीज, आदित्य नीफ लाइफ सन बँक, आदित्य नीफईटी बँक , मुथूट फायनान्स, एनएलसी इंडिया, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स, सीमेन्स, एल्गी इक्विपमेंट्स, काकतिया सिमेंट शुगर अँड इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, कॉन्सॉलिडेटेड फिनव्हेस्ट अँड होल्डिंग्ज आणि व्हीआरएल लॉजिस्टिक्स हे NSE वर व्हॉल्यूम गेनर्स होते.
हे ही वाचा :