महाप्रबोधन यात्रेला गालबोट लावण्याचा शिंदे गटाचा कट : सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या | पुढारी

महाप्रबोधन यात्रेला गालबोट लावण्याचा शिंदे गटाचा कट : सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : मारहाण प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय यावेळी बीडमधील सभेपूर्वीच्या कार्यक्रमात काय घडलं, याबद्दल अंधारे जरा स्पष्टचं बोलल्या. त्या म्हणाल्या-महाप्रबोधन यात्रेला गालबोट लावण्यासाठी शिंदे गटाचा कट आहे. अप्पा जाधव यांचे सर्व दावे खोटे आहेत. पक्षांतील पदांसाठी अंधारे पैसे मागतात, असा आरोप माझ्यावर झाला. तर खरचं माझे बँकेचे अकाऊंट तपासायला हवे, असे अंधारे म्हणाल्या. कालच्या मारहाण प्रकरणावर अंधारे काय म्हणाल्या पहा-

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा बीडमध्ये होणार होती. तत्पूर्वी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी शिवसेना नेते बीडमध्ये आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी आपण सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा अप्पासाहेब जाधव यांनी व्हिडिओतून केला आहे. तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनीही जाधव यांना मारहाण केल्याची चर्चा आहे.

Back to top button