J. P. Nadda : कौशल्य विकसित करणे ही निरंतर प्रक्रिया : जे. पी. नड्डा | पुढारी

J. P. Nadda : कौशल्य विकसित करणे ही निरंतर प्रक्रिया : जे. पी. नड्डा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. आपली कौशल्य विकसित करणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. काळाप्रमाणे स्वत:ला बदलणं गरजेचं आहे. नोकरीच्या गरजेप्रमाणे स्वत:मध्ये बदल करा. हे जग हे दररोज बदलणारं आहे. असं वक्तव्य भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. आज (दि.१८) ते मुंबईत तरुणांशी संवाद साधत होते. जे.पी.नड्डा  आज (दि.१८) दुपारनंतर पुणे दौऱ्यावर आहेत. (J. P. Nadda)

J. P. Nadda : १ कोटी १० लाख तरुणांना प्रशिक्षण

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुंबईत तरुणांशी संवाद साधत असताना म्हणाले, आज देश जिथून उभा आहे, त्या देशाच्या भविष्याची चिंता करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेद्वारे आम्ही १ कोटी १० लाख तरुणांना प्रशिक्षण दिले आहे. स्टार्ट अप्सबद्दल बोलायचे झाले तर आधी देशात चार युनिकॉर्न होते, आज १०० आहेत. हा आपल्या कौशल्य भारताचा आणि युवा शक्तीचा पुरावा आहे. तुम्हा सर्व तरुणांनो, कधीही लहान ध्येय ठेवू नका. मोठा विचार करा, तुमच्यासाठी आकाश ही मर्यादा आहे. आज तुमच्यासमोर वाढण्याची मर्यादा नाही. उद्या तोच असेल. ज्याचा पाया आपण आज घालू. म्हणून मोठा विचार करा, स्वतःचे मूल्यमापन करा आणि कालपेक्षा आजचा दिवस कसा चांगला बनवायचा याचा प्रयत्न करा. (J. P. Nadda )

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे बुधवार(दि.१७) पासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर येत असून, ते पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या होणार्‍या बैठकीचा समारोप करणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button