राज्यात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार; गृहमंत्री फडणवीसांचा इशारा

राज्यात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार; गृहमंत्री फडणवीसांचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये शनिवारी (दि.१३) दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यावरून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. दंगली घडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर अद्दल घडवणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

आज माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, राडा झालेल्या दोन्ही ठिकाणी शांतता आहे. काही लोकांकडून जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, राज्यात दंगली घडवू देणार नाही. दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांच्या अपात्रेतेबाबतचा निर्णय लवकर घ्यावा अन्यथा रस्त्यावरून फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, जे काही चाललं आहे ते कोणत्याही लोकशाहीत चालणार आहे. तुम्ही खरे असालं तर तुमचा मुद्दा मांडा. तुमची बाजू कमकुवत असल्यानचं अशी वक्तव्य केली जात आहेत. अध्यक्ष कोणतंही बेकायदेशीर काम करणार नाहीत. ते योग्य निर्णय घेतील कोणी कीतीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी ते दबावाला बळी पडणार नाहीत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news