Stock Market Closing | शेअर बाजार अस्थिर, सेन्सेक्स, निफ्टी लाल चिन्हात बंद, जाणून घ्या मार्केटमधील आजची स्थिती

Stock Market Closing | शेअर बाजार अस्थिर, सेन्सेक्स, निफ्टी लाल चिन्हात बंद, जाणून घ्या मार्केटमधील आजची स्थिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : संमिश्र जागतिक संकेतांमुळे आज भारतीय शेअरात चढ- उतार दिसून आला. तेजीत सुरुवात केल्यानंतर बाजार सपाट झाला. आज सेन्सेक्स (Sensex) ३५ अंकांनी घसरून ६१,९०४ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) १८ अंकांच्या घसरणीसह १८,२९७ वर स्थिरावला. कालच्या घसरणीनंतर आज सर्व सरकारी बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आज सुमारे २ हजार शेअर्स वाढले. तर १,४३६ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १५१ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. (Stock Market Closing)

'हे' शेअर्स टॉप गेनर्स

अदानी एंटरप्रायजेसचा शेअर आज ४ टक्क्यांहून अधिक वाढला. सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, एचसीएल टेक हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर एलटी, आयटीसी, भारती एअरटेल, रिलायन्स, इन्फोसिस हे शेअर्स घसरले होते. आजच्या ट्रेडिंगमध्ये NSE वर Dr. Reddy's Laboratories, लार्सेन अँड टुब्रो, हिंदाल्को इंडस्ट्रीज, Aurobindo Pharma यांचे सर्वाधिक नुकसान झाले.

नफा वाढल्याने एशियन पेंट्सचा शेअर तेजीत

एशियन पेंट्स (Asian Paints) कडून गुरुवारी सांगण्यात आले की त्यांचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक ४५ टक्के वाढून आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत १,२३४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत हा नफा ८५० कोटी रुपये होता. दरम्यान, एशियन पेंट्सचा शेअर आजच्या व्यवहारात ३ टक्के वाढून ३,१३६ रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे सकारात्मक संकेत आहे. (NIFTY 50)

परदेशी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) बुधवारी १० मे च्या ट्रेडिंगमध्ये निव्वळ खरेदीदार राहिले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी १० मे रोजी बाजारात १,८३३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याच दरम्यान देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) निव्वळ विक्रेते राहिले. त्यांनी १० मे रोजी सुमारे ७८९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

अमेरिकेतील महागाईची तीव्रता कमी झाल्याच्या रिपोर्टमु‍ळे आशियाई बाजारातही आज संमिश्र वातावरण राहिले. जपानचा बेंचमार्क Nikkei 225 आज ०.२ टक्क्यांनी घसरून २९ हजारांवर होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी (South Korea's Kospi) ०.४ वाढून २,५०६ वर आला. हाँगकाँगचा हँग सेंग (Hang Seng Index) ०.१ टक्क्यांनी घसरून १९,७४१ वर होता. तर शांघाय कंपोझिट ३,३१९ वर राहिला.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news