Maharashtra politics news : उद्धव ठाकरेंचा राजीनामा राजकीय संस्कृतीला साजेसा : सुषमा अंधारे | पुढारी

Maharashtra politics news : उद्धव ठाकरेंचा राजीनामा राजकीय संस्कृतीला साजेसा : सुषमा अंधारे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११)  लागला. सर्वोच्‍च न्‍यायालयाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय  विधानसभा अध्यक्षांकडे साेपवला आहे.  हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्‍ही पूर्वीचे सरकार कायम ठेवत उद्धव ठाकरेंना पुन्हा‍ मुख्‍यमंत्रीपदाचा अधिकार बहाल केला असता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर सत्ताधारी पक्षासह विविध पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Maharashtra politics news) ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ‘संस्कृतीला साजेसा’ म्हटलं आहे.

तर आम्‍ही उद्धव ठाकरेंना पुन्‍हा मुख्‍यमंत्रीपद बहाल केले असते

सर्वोच्च न्यायलयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील याचिकावर फैसला सुनाविताना म्हटलं की, ‘२९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे राजीनामा दिला त्‍यामुळे राज्‍यपालांनी नवीन सरकार स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेतला. जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्‍ही पूर्वीचे सरकार कायम ठेवत उद्धव ठाकरेंना पुन्हा‍ मुख्‍यमंत्रीपदाचा अधिकार बहाल केले असते.”

Maharashtra politics news : राजकीय संस्कृतीला साजेसा

यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भूमिकेबद्दल म्हटलं आहे की,”पक्षप्रमुखांनी जो राजीनामा दिला तो राजकीय संस्कृतीला साजेसा होता. ‘जुडीशियल इथिक्स’चा भाग म्हणून सुद्धा ते अतिशय योग्य होतं. आपल्या आतला आवाज, विवेक जागृत ठेवून उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला होता तो कालही योग्यच होता & न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतरसुद्धा आम्हाना योग्यच वाटतो.” 

हेही वाचा 

Back to top button