Maharashtra Politics Crisis : काय हिरवळ,आज वाट पाहतोय तुमची 'नरहरी झिरवळ'; संजय राऊत यांचं मिश्किल ट्विट | पुढारी

Maharashtra Politics Crisis : काय हिरवळ,आज वाट पाहतोय तुमची 'नरहरी झिरवळ'; संजय राऊत यांचं मिश्किल ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सत्तासंघर्षावर आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निकाल देणार आहे. न्यायालयाच्या ‘हायव्होल्टेज’ निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणार्‍या 16 आमदारांच्या सदस्यत्वाच्या वैधतेबाबत घटनापीठ निकाल सुनावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य या निकालाने निश्चित होणार असल्याने या हायव्होल्टेज निकालाविषयी उत्सुकता वाढली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता निकाल सुनावला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक मिश्किल ट्विट केलं आहे. (Maharashtra Politics Crisis)

Maharashtra Politics Crisis : सत्तासंघर्षावर आज सुनावणी

राज्यात गतवर्षीच्या जून महिन्यात अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आणि महाराष्ट्रातील राजकारणात नाट्यमयरित्या वळण मिळत महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस अशी युती होत सरकार स्थापन झाले. आज राज्यातील सत्तासंघर्षावर सकाळी 11 वाजण्याच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेतील १६ आमदारांना अपात्रतेची नोटिस पाठवली होती.

नरहरी झिरवळ नॉट रीचेबल 

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे सकाळपासनू नॉट रीचेबल आहेत. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनूसार झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी झिरवळ नॉट रीचेबल असल्याने सोशल मीडियासह राजकीय वर्तूळात चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर ते त्यांच्या गावीही नाही आहेत. झिरवळ यांनी शिवसेनेतील १६ आमदारांना अपत्रतेची नोटिस पाठवली होती.

Maharashtra Politics Crisis : काय झाडी ,काय डोंगर

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते गुहावाटीला गेले. त्यानंतर काही आमदारही गेले होते. या आमदारांमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापूही होते. या दरम्यान त्यांचा एक कॉल रेकॉर्ड व्हायरलं झाला होता. या कॉल रेकॉर्डमध्ये ते “मी सध्या गुवाहाटीत आहे,’ असे म्हणून, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे…’ अशा शब्दांत आपली ख्यालीखुशाली आपल्या एका कार्यकर्त्याला सांगत होते.  हा डॉयलॉग सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. या डॉयलॉग घेत,  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एक मिश्किल ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..
जय महाराष्ट्र!”

हेही वाचा 

Back to top button