Sonia Dohoon | काेण आहेत ‘NCP’च्‍या ‘लेडी जेम्स बॉन्ड’ सोनिया दुहान? जाणून घ्‍या त्‍यांचा राजकीय प्रवास… | पुढारी

Sonia Dohoon | काेण आहेत 'NCP'च्‍या 'लेडी जेम्स बॉन्ड' सोनिया दुहान? जाणून घ्‍या त्‍यांचा राजकीय प्रवास...

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, “भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे” म्हणतं २ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्‍याची  घोषणा केली. त्‍यांच्‍या या निर्णयाने  राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. शरद पवार यांची ही नवी खेळी नाही ना? यावर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये घडलेल्‍या नाट्यमय घडामाेडीत सोनिया दुहान   (Sonia Dohoon) हे नाव चर्चेत आले आहे. जाणून घेवूया त्‍यांच्‍या राजकीय प्रवासाविषयी…

Sonia Dohoon

एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा देवू नये म्हणून आंदोलन केले. भावनिक आवाहन केले. राजीनाम घोषीत करताना त्यांनी हेही नमुद केले होते की,”संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे”.  अखेर ५ मे रोजी या नाट्यावर पडदा पडत मी कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देत  राजीनामा  देत नसल्याचे त्यांनी घोषीत केले. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांसह काही तरुण नेतृत्व ही यावेळी उपस्थित होते. यामध्ये आमदार रोहित पवार, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्‍या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर आदी उपस्‍थित होते. 

Sonia Dohoon : कोण आहेत सोनिया दुहान 

सोनिया दुहान सध्या चर्चेत आहेत. सोनिया यांची चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. तर २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे-पहाटे युती करत सरकार स्थापन केलं हाेते. यावेळीही त्या चर्चेत आल्या होत्या. सोनिया सध्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत. 

शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या  सोनिया दुहान (Sonia Dohoon) या हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील पेटवाड येथील रहिवासी आहेत.  त्यांच्या वडिलांच नाव संसार सिंह तर आईच नाव संतरो देवी असं आहे. २०१३ मध्ये त्यांच्या वडिलांच कॅन्सरने निधन झाले. तिघा भांवडात त्य़ा सर्वात मोठ्या आहेत. घरातील मोेठी मुलगी म्हणून घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येवून पडली. त्यांनी शिक्षण त्यांच्या गावातच झालं. माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठ मधुन बीएससी पुर्ण केले. बीएससी झाली.  त्यानंतर त्या अंबाला येथे आल्या.

अशी झाली राजकारणात एंट्री

सोनिया या पायलटच्या शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आल्या. तिथे त्यांनी पायलटचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण दरम्यान त्या राष्ट्रवादी क़ॉंग्रेसच्या संपर्कात आल्या. सोनिया यांनी वयाच्या २१ व्या वर्षी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामिल झाल्या. दिल्ली युनिव्हिर्सिटीमध्ये त्यांनी दोन निवडणूकांमध्ये विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व केले. अश्या तऱ्हेने त्यांचा विद्यार्थीदशेत राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्‍या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष झाल्या. 

२०१९ मधील राजकीय नाट्यातील ‘NCP’ ची  जेम्स बॉंड

२०१९ मध्ये सोनिया चर्चेत आल्या होत्या. तेव्हा त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण आणि आठवणीत राहणारा दिवस म्हणजे २३ नाेव्‍हेंबर २०१९ राेजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात भूकंप आणणारी ही घटना हाेती. तेव्हा सोनिया चर्चेत आल्या होत्या. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार नॉट रिचेबल होते. यावेळी सोनिया दुहान गुरुग्राममधील ओबेरॉय हॉटेलमधुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना शिताफीने बाहेर काढलं आणि त्या चर्चेत आल्या.

शिंदेच्या बंडखोरीशी देखील संबंध?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते सुरतहून गुवाहाटीमध्ये काही आमदारासह गेले होते. काही दिवसानी हे आमदार गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये पोहचले होते. तेव्हा याच सोनिया दुहान यांच्‍यावर आमदारांना शिवसेनेत परत आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. काही आमदारांशी त्यांनी संपर्क केलाही होता. मात्र त्या यात यशस्वी झाल्या नाहीत. 

२०१९ आणि २०२२ मधील त्यांच्या भूमिकेमूळे त्यांची राष्ट्रवादीची ‘लेडी जेम्स बाँड’ अशी ओळख झाली. आता पुन्हा एकदा त्या शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या नाट्यानंतर चर्चेत आल्या आहेत. मी राजीनामा देत आहोत, “संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे” अशी घोषणा शरद पवार यांनी केली. यावेळी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते आणि युवा नेतृत्व सोबत होते. या युवा नेतृत्वात सोनिया दुहान याही होत्या. आता त्यांच्यावर कोणती जबाबदारी पडणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. 

हेही वाचा 

Back to top button