मुंबई : रेल्वेकडून रविवारी ट्रान्स हार्बर मार्गांवर ब्लॉक | पुढारी

मुंबई : रेल्वेकडून रविवारी ट्रान्स हार्बर मार्गांवर ब्लॉक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्ती करीता रविवार 7 मे रोजी ट्रान्स हार्बर मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मेन लाईन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

रविवारी, ठाणे – वाशी/ नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ०४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. या दरम्यान ठाणे ते वाशी, नेरुळ, पनवेल दरम्यानची अप आणि डाउन दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा असे आव्हान मध्य रेल्वेने केले आहे.

हेही वाचा :  

Back to top button