Sharad Pawar Resign : शरद पवार विरोधकांचे आधारस्तंभ, निवृत्ती मागे घ्यावी हीच सर्वांची इच्छा – संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sharad Pawar Resign : देशाला सध्या शरद पवार यांची गरज आहे. शरद पवार हे विरोधकांचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे निदान लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत शरद पवारांनीच नेतृत्व करावे. देशातील सर्व प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे, शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, हीच सर्वांची इच्छा आहे. असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार Sharad Pawar Resign यांनी मंगळवारी (दि.2 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा. यासाठी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांपासून सर्व वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनीच आग्रह धरला आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांनी देखील शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या Sharad Pawar Resign या निर्णयावर तसेच नवीन अध्यक्ष निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवड समितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीची आज बैठक होऊन यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी असेही म्हटले आहे की शरद पवार विरोधकांचे आधारस्तंभ आहेत. देशाला त्यांची गरज आहे, त्यामुळे किमान लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, असे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news