Stock Market Opening | 'या' शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा, सेन्सेक्स २५० अंकांनी घसरला | पुढारी

Stock Market Opening | 'या' शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा, सेन्सेक्स २५० अंकांनी घसरला

पुढारी ऑनलाईन : HDFC च्या दोन्ही शेअर्समधील विक्रीचा सपाटा आणि प्रतिकूल जागतिक संकेतांदरम्यान शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारातील निर्देशांक घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) २५० हून अधिक अंकांनी घसरून ६१,५०० च्या खाली आला. तर निफ्टी (Nifty) १८,२०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर एचडीएफसी (HDFC) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी घसरले. इंडसइंड बँक, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स हेदेखील लाल चिन्हात खुले झाले आहेत. तर आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, ॲक्सिस बँक, नेस्ले, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वधारुन खुले झाले आहेत. (Stock Market Opening)

TVS मोटर्सच्या शेअर्समध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे. चौथ्या तिमाहीत TVS Motors ने नफ्यात ४९ टक्के वाढ नोंदवली आहे. यामुळे कंपनीचा शेअर वधारला आहे. सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईवर हा शेअर १,२२८ रुपयांवर व्यवहार करत होता. तो मागील बंदच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढला.

निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस १.२४ टक्के आणि निफ्टी बँक ०.६१ टक्के घसरले. तर, ऑटो, एफएमसीजी, रियल्टी, consumer durables, ऑईल अँड गॅस स्टॉक्स वाढले आहेत. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

Back to top button