आज कोणतीही बैठक नाही, कोणताही निर्णय झाला नाही : प्रफुल्ल पटेल | पुढारी

आज कोणतीही बैठक नाही, कोणताही निर्णय झाला नाही : प्रफुल्ल पटेल

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहवं, अशी सर्वांची इच्छा आहे. याबाबत विचार करण्याासठी त्यांनी दोन दिवस मागितले. यावर ते विचार करत आहेत. आज कोणतीही बैठक किंवा चर्चा झाली नाही. याबाबत होणाऱ्या बैठकीचा मीच निमंत्रक असणार आहे, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

आज माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार यांनी स्वत: हा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अध्यक्षपदासाठी कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. सर्व कार्यकर्त्यांनी धीर धरावा. वेळआल्यास अध्यक्षांची निवड एकमताने केली जाईल, असे आवाहन पटेल यांनी केले आहे. मी अध्यपदाची जबाबदारी घेण्यास तयार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान १४ मे रोजी पुण्यात होणारी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा रद्द करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांच्या निर्णयाचा आणि वज्रमुळ सभा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा काहीही संबंध नाही. सभा पुढे ढकलण्याचा निर्णय एकमताने झाला आहे. जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जयंत पाटील यांचा कोणताही नाराजीचा सुर नाही. कारखान्याच्या बैठकीसाठी जयंत पाटील पुण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button