राहुल गांधी नाना पटोलेंपेक्षा माझ्‍याशी जास्‍त बोलतात : संजय राऊत | पुढारी

राहुल गांधी नाना पटोलेंपेक्षा माझ्‍याशी जास्‍त बोलतात : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राहुल गांधी हे महाराष्‍ट्राचे काँग्रेचे प्रवक्‍ते नाना पटोले ( Nana Patole ) यांच्‍यापेक्षा जास्‍त माझ्‍याशी बोलतात, अशा शब्‍दांमध्‍ये ठाकरे गटाचे प्रवक्‍ते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी नाना पटोले यांना प्रत्‍युत्तर दिले.

 

काँग्रेसचे अध्‍यक्ष खर्गे आहेत;पण पक्षाचे सर्व निर्णय राहुल गांधी हेच घेतात असे विधान राऊत यांनी केले होते. संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबूड करू नये. त्‍यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही.त्यांनी आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या तिथे प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नये, अशा शब्‍दांमध्‍ये नाना पटोले यांनी हल्‍लाबोल केला होता.
( Maharashtra politics )

बेळगाव येथे माध्‍यमांशी बाेलताना राऊत म्‍हणाले, “प्रत्‍येक पक्षाला आपलं मत मांडण्‍याचा अधिकार आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांच्‍यापेक्षा माझ्‍याशी बोलतात.”

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आमची भूमिका ही महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत आहे; पण एकीकरण समितीचा पराभव होण्यासाठी महाराष्ट्रातून पैसे पाठवले. एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव होण्यासाठी भाजपचा डाव असल्‍याचा आरोपाचा पुन्‍नरुच्‍चारही खासदार संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : 

 

 

Back to top button