Sanjay Raut : 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण?' | पुढारी

Sanjay Raut : 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण?'

पुढारी ऑनलाईन डेस्क : खारघरमध्ये १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर तेथे श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना कशी घडली, हिंमत असेल तर सांगा, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रश्नांची सरबत्ती करत सरकारवर निशाणा साधला. यावेळी राऊत पुढे म्हणाले, तुम्ही फक्त बेईमानाच्या चिपळ्या वाजवत आहात. लाईट अॅन्ड शेडस कंपनीत भागीदार कोण आहे? खारघर दुर्घटनेत मृतांचा आकडा जास्त आहे. हा आकडा वाढू शकतो. या लोकांना उन्हात फायद्यासाठी उपाशी ठेवले. त्यांना सावलीची सोय केली नाही. मुळात आयोजकांना जगाला ड्रोनच्या माध्यमातून दाखवायचे होते की, किती गर्दी आहे, असा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केला. (Sanjay Raut)

Sanjay Raut : भाजपने अनेक पोपट पाळलेत 

गेल्या ९ महिन्यांपासून शिंदे-फडणवीस युतीकडे सत्ता आहे. मग मराठा आरक्षण प्रश्न मार्गी का लागला नाही. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना  सांगायचे आरक्षण देतो, सत्ता द्या. मग आता आरक्षण प्रश्न का मार्गी लागत नाही? मराठा आरक्षणात कुठे कमी पडलात ते  फडणवीस यांनी लोकांना सांगावे, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. म्हणाले, काहींना झोपेतही उद्धव ठाकरे दिसतात. बोलण्यासाठी बरेच प्रश्न आहेत पण त्यावर बोललं जात नाही. भाजपने अनेक पोपट पाळलेले आहेत. राज ठाकरे आता विश्वाचे नेते बनले आहेत, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

फक्त बेईमानाच्या चिपळ्या वाजवत आहात

खारघर दुर्घटनेवर बोलत असताना म्हणाले, खारघरमध्ये १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर तेथे श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना कशी घडली. हिंमत असेल तर ते सांगा, असे आव्हान राऊत यांनी केले. तुम्ही फक्त बेईमानाच्या चिपळ्या वाजवत आहात. लाईट अॅन्ड शेडस कंपनीत भागीदार कोण आहे? ते सांगा. खारघर दुर्घटनेत मृतांचा आकडा जास्त आहे. हा आकडा वाढू शकतो. या लोकांना उन्हात फायद्यासाठी उपाशी ठेवले. त्यांना सावलीची सोय केली नाही. आयोजकांना जगाला ड्रोनने दाखवायचे होते की, गर्दी किती आहे, असे थेट आरोप देखील संजय राऊत यांनी केले. पुढे बोलत असताना म्हणाले, स्वार्थासाठी लोकांना उन्हात उपाशी ठेवले. एकीकडे शाही मेजवानी सुरु होती. या शाही मेजवानीची चौकशी करणार आहात का? खारघर दुर्घटनेप्रकरणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनाची मागणी केली आहे. याला माझे समर्थन आहे.

हेही वाचा 

Back to top button