Sanjay Raut : खारघर दुर्घटनेमधील मृतांचा आकडा सरकार लपवतंय : संजय राऊत  | पुढारी

Sanjay Raut : खारघर दुर्घटनेमधील मृतांचा आकडा सरकार लपवतंय : संजय राऊत 

पुढारी ऑनलाईन डेस्क : खारघर येथे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री गप्प का आहेत? खारमधील मृतांचा आकडा ५० हून अधिक आहे. आणि राज्यसरकार तो आकडा लपवत आहे. ५० लोकांचा बळी घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. या सरकराला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. या दुर्घटनेवर विशेष अधिवेशन बोलवा.कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या, ‘खारघर घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे’ या वक्तव्याशी मी सहमत आहे. असं त्यांनी आज माध्यमांना बोलताना सांगितले. (Sanjay Raut)

खासदार संजय राऊत म्हणाले की, पालघरच्या हत्याकांडापेक्षा हे भयानक मोठ हत्यांकांड आहे. “पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली. त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांवर जवळजवळ हल्ला करुन  नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पपाणी आक्रोश केला, म्हणून अटक केलं. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली आहे. ठाकरे सरकारची काम हे सरकार रोखतय. खारमधील मृतांचा आकडा ५० हून अधिक आहे. आणि राज्यसरकार तो आकडा लपवत आहे. ५० लोकांचा बळी घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. या सरकराला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. पालघरमधील साधुंची हत्त्या झाली तेव्हा फडणवीस ठाण मांडून बसले होते. आता कुठे गेली त्यांची माणुसकी

हेही वाचा 

Back to top button