Stock Market Opening | मंदीच्या भीतीने शेअर बाजारावर दबाव, ‘हे’ IT शेअर्स घसरले | पुढारी

Stock Market Opening | मंदीच्या भीतीने शेअर बाजारावर दबाव, 'हे' IT शेअर्स घसरले

Stock Market Opening : अमेरिकेतील सौम्य स्वरुपाच्या मंदीने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात काही प्रमाणात घसरण दिसून येत आहे. आयटी आणि खासगी बँकिंग स्टॉकमधील तोट्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी खाली आले आहेत. बँकिंग क्षेत्रातील संकटाचा संभाव्य परिणाम म्हणून या वर्षाच्या शेवटी मंदी राहणार असल्याचे संकेत अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. यामुळे जगभरातील गुंतवणूक धास्तावले आहेत. परिणामी, आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १०० अंकांनी घसरून ६०,२९० वर आला. तर निफ्टी १७,७९० वर होता.

सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस आणि विप्रो हे शेअर्स घसरले होते. हे शेअर्समध्ये १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. एम अँड एम, पॉवर ग्रिड, रिलायन्स, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट हे वाढून खुले झाले आहे.
उत्तर पश्चिम रेल्वेकडून ६३० दशलक्ष रुपयांच्या ऑर्डरसाठी कंपनीला पत्र मिळाल्याने रेल्वे विकास निगमचे शेअर्स ३ टक्के वाढले. HDFC बँकेने एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँके ऑफ कोरियाशी ३०० दशलक्ष डॉलर क्रेडिट लाइनसाठी करार केल्यानंतर HDFC बँकेचे शेअर्स वधारले आहेत.

सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी १.२६ टक्के घसरला होता. तर निफ्टी प्रायव्हेट बँक ०.३१ टक्के खाली आला होता. ऑटो, FMCG, फायनान्सियल, मेटल, रियल्टी, ऑईल अँड गॅस हे वाढले आहेत. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

Back to top button