BJP Foundation Day : वाजपेयींचे स्मरण करत रोहित पवारांनी भाजपला दिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, म्‍हणाले… | पुढारी

BJP Foundation Day : वाजपेयींचे स्मरण करत रोहित पवारांनी भाजपला दिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाचा आज ४४ वा वर्धापन दिन. याचे औचित्य साधत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा संदर्भ देत त्यांनी भाजपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (BJP Foundation Day )

Image

BJP Foundation Day

BJP Foundation Day : आज विचलित झालेली भाजपा…

रोहित पवारांनी भाजपला वर्धापन दिनानिमित्त दिलेल्‍या शुभेच्छा वाचा त्यांच्याच शब्दांत. “स्व. अटलबिहारी वाजपेयीजी, लालकृष्ण अडवाणीजी, स्व. प्रमोद महाजन साहेब, स्व. मुंडे साहेब यांच्या कष्टाने बहरलेल्या पण आज सत्तावादी बनलेल्या भारतीय जनता पक्षास सत्यवादी बनण्यासाठी वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा! ‘सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए’, स्व. अटलजींच्या याच विचारांवर एकेकाळी चालणारी पण आज विचलित झालेली भाजपा येत्या काळात लोकशाही विचारांना जपण्याचा प्रयत्न करेल, ही अपेक्षा. आपला वैचारिक लढा हा कायम राहील परंतु लोकहितासाठी एकत्र येण्याची गरज असेल तिथं एक नागरिक म्हणून नक्कीच सहकार्य राहील.”

हेही वाचा 

Back to top button