संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा घणाघात; म्हणाले आईसमान पक्ष बदलणारे… | पुढारी

संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा घणाघात; म्हणाले आईसमान पक्ष बदलणारे...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भ्रष्टाचाऱ्यांची आणि गुंडांची टोळी चालवून विरोधकांवर भिजलेली काडतूस फेकून मारता, त्यापेक्षा भ्रष्ट मंत्र्यांवर काडतुसं फेका. आमची भिजलेली काडतुसही उडतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्यासारखे लोक आईसमान पक्ष बदलतात त्यांच्याबद्दल काय बोलायच, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला.

संजय राऊत म्हणाले की, ईडी, सीबीआय विरोधात याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्याने भाजपने खुश होण्याची गरज नाही. काही कागदपत्रांची पुर्तता झालेली नाही. आम्ही पुन्हा न्यायालयात जाणार आहे. भाजपच्या नेत्यांवर कधीच कारवाई होत नाही. बेईमान लोकांना मंत्रिपद देणं हे भाजपच काम आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांच्याबाबतीत गैरवापर केला जातो. भाजपच्या वॉशींग मशीनमध्ये टाकलेल्यांवर का कारवाई होत नाही. मंत्री दादा भुसे, आमदार राहूल कूल यांच्यावर का कारवाई केली जात नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काडतूस असतील तर याचे त्यांनी उत्तर द्यायला हवे. राज्यसरकार भ्रष्टाचाऱ्यांना आणि गुंडांना पाठीशी घालते. देश हुकुमशाही पद्धतीने चालवला जात आहे. तुम्ही काडतूस असाल किंवा फडतूस आम्हाला त्यात पडायच नाही. भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेवून बसला आहात आणि विरोधकांवर भिजलेली काडतूस फेकून मारता त्यामुळे काही होणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी उपुमख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.

हेही वाचा : 

Back to top button