Stock Market Opening | सेन्सेक्स ३५० अंकांनी वाढला, ‘या शेअर्समध्ये जोरदार खरेदी | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स ३५० अंकांनी वाढला, 'या शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Opening : हेविवेट एचडीएफसी आणि बजाज शेअर्समधील जोरदार खरेदीच्या जोरावर आज बुधवारी (दि. ५) सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह खुले झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३५० अंकांनी वाढून ५९,४०० वर पोहोचला. तर निफ्टी १७,४९० वर होता. बँकिंग शेअर्स ‍वधारले असून निफ्टी बँक ६८ अंकांनी वाढून ४०,८८१ वर पोहोचला.

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, टायटन, एचडीएफसी, पॉवर ग्रिड, रिलायन्स, एलटी, आयटीसी, मारुती, भारती एअरटेल, सन फार्मा, कोटक बँक, टाटा मोटर्स, विप्रो हे शेअर्स हिरव्या चिन्ह्यात खुले झाले आहेत. तर ॲक्सिस बँक, नेस्ले, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआय, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील हे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात घसरले होते.

अदानी समूहाचे शेअर्स स्थिर पातळीवर व्यवहार करत आहे. अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पॉवर, अदानी विल्मर, एनडीटीव्ही हे शेअर्स काही प्रमाणात वाढले आहेत. तर अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अंबुजा सिमेंट यात घसरण दिसून येत आहे.

हे ही वाचा :

Back to top button