Stock Market Opening : तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना – 'ओपेक' (OPEC+) ने अचानक उत्पादनात कपात केल्यानंतर तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे महागाई आणखी वाढू शकते या चिंतेने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी (दि.३) आर्थिक वर्षातील पहिल्या सत्रात भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून येत आहे. सुरुवातील सेन्सेक्स १२० अंकांनी वाढून ५९ हजारांवर पोहोचला होता. तर निफ्टी १७,३५० वर होता. त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांक स्थिर पातळीवर आले. ऑईल आणि गॅस मार्केटिंग स्टॉक्स घसरले आहेत. बीपीसीएलचे शेअर्स ३ टक्क्यांने घसरले. तर आयशर मोटर्सचा शेअर २ टक्क्यांनी वाढला.
सुरुवातीला मारुती, अल्ट्राटेक, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, टायटन, एचसीएल टेक, एम अँड एम, एलटी, कोटक महिंद्रा, टाटा मोटर्स, एनटीपीसी, रिलायन्स, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, विप्रो, आयसीआयसीआय बँक, टीसीएस हे शेअर्स वाढले आहेत. तर सन फार्मा, आयटीसी, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स हे घसरले होते. (Stock Market Opening)
हे ही वाचा :