Sanjay Raut : आजची सभा ऐतिहासिक होईल; संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : आजची सभा ऐतिहासिक होईल; संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सावरकरांचे विचार आम्ही पुर्णत: आत्मसात केले आहेत. मिंधे गटाने सावरकरांचे  साहित्य वाचावे, समजूव घ्यावे. त्यांच्या विचारांच पारायण करावे. सावरकरांचे हिंदुत्वाचं विचार भाजपाला मान्य आहेत का? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी सावरकर गौरव यात्रेवर टीकास्त्र सोडले. आज छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीची व्रजमूठ सभा होत आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलत असताना, या सभेची जोरदार तयारी झाली आहे. सभा शांततेत पार पडली जाईल. आजची सभा ऐतिहासिक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Sanjay Raut)

Sanjay Raut :सावरकरांचे हिंदुत्वा संबधीचे विचार भाजपाला मान्य आहेत का? 

सावरकर गौरव यात्रे संदर्भात बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. म्हणाले,  सावरकरांचे गोमाता बदद्ल काय विचार होते हे मिंधे गटाला माहित आहेत का? सावकरांनी हिंदुत्वाचा विचार सांगताना वैज्ञानिक सांगितला. सावकरांना दाढी आवडायची नाही तर एकनाथ शिंदे दाढी काढून यात्रेच सहभागी होणार आहेत का? असा सवाल त्यांनी केला. सावरकरांचे साहित्य मिंधे गटाने वाचावे, त्यांच्या विचारांचे पारायण करावे मग यात्रेत सहभागी व्हावे.  सावरकरांचे हिंदुत्वाचं विचार भाजपाला मान्य आहेत का?  सावरकरांचा विचार आम्ही पुर्णत: आत्मसात केला आहे. अस म्हणतं त्यांनी सावरकर गौरव यात्रेवर टीकास्त्र सोडले.

हेही वाचा 

Back to top button