Corona : कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी | पुढारी

Corona : कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Corona : देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आहेत. आपल्या राज्यातील रुग्णसंख्या २१.७ टक्के इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. शनिवारपर्यंत महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णसंख्या १७६३ होती. काल एका दिवसात १४६ रुग्ण वाढले.

मंत्रालयानुसार दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत सक्रिय कोरोना रुग्णसंख्येमध्ये केरळ राज्य आघाडीवर आहे. तेथील रुग्णांची टक्केवारी २६.४ टक्के इतकी आहे. महाराष्ट्राशेजारील गुजरात आणि कर्नाटक राज्यांतही कोरोना वाढत आहे. गुजरातमध्ये १३.९ आणि कर्नाटकमध्ये ८.६ टक्के रुग्ण आहेत. सर्वाधिक कोर- नाग्रस्त असणार्या पहिल्या पाच राज्यांमध्ये तामिळनाडूचाही (६.३ टक्के)
समावेश आहे.

देशात सामान्यतः जानेवारी ते मार्च आणि पुन्हा ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये हंगामी वाढ दिसून येते. सध्या, इन्फ्लूएंझाचे देशातील प्रचलित सर्वात प्रमुख उपप्रकार इन्फ्- लूएंझा ए (एच१एच१) आणि इन्फ्- लूएंझा ए (एच३एन२) आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे

हे ही वाचा :

हापूस निर्यातीतून कोट्यवधींचे परकीय चलन; कोकणातील 40 टक्के आंबा जातो युरोप, आखाती देशात

मोठ्या आकाराच्या कोळ्यांच्या नव्या प्रजातीचा ऑस्ट्रेलियात शोध

Back to top button