मुंबई: चुनाभट्टी येथील गोदरेज इमारतीला भीषण आग | पुढारी

मुंबई: चुनाभट्टी येथील गोदरेज इमारतीला भीषण आग

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : चुनाभट्टी येथील गोदरेज कोलेजियम या इमारतीला आज (दि.२४) दुपारी भीषण आग लागली. शेकडो विविध कार्यालय असलेल्या १३ मजली या इमारतीच्या ११ ते १३ मजल्यांपर्यंत ही आग लागली. यात काही कर्मचारी अडकले होते. परंतु घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सर्वांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button