राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय द्वेष भावनेतून : ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सुरत सत्र न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभाही दिलेली आहे. राहुल गांधी यांनी आपील करणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असताना भाजप सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. हा निर्णय द्वेष भावनेतून घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (दि.२४) पत्रकारांशी बोलताना दिली.
सरकारने किमान उच्च न्यायालय ऑर्डर रद्द करते का याची वाट पाहायला हवी होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द केली नसती, तर सरकारने आपला अधिकार वापरला असता, तर योग्य झाले असते. मात्र, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यामागे केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे. याचा निषेध करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलंत का ?
- Rahul Gandh: राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून! : नाना पटोले
- RahulGandhi: राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय; लोकशाहीला धक्का देणारा – अजित पवार
- Rahul Gandhi : राहुल गांधी यांना लोकसभेचे खासदार म्हणून का केले अपात्र?