Election 2024 : राज्य विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव; ‘मविआ’त फूट शक्य | पुढारी

Election 2024 : राज्य विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव; ‘मविआ’त फूट शक्य

मुंबई; वृत्तसंस्था : महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रित घ्याव्यात, असा प्रस्ताव प्रदेश भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती आहे. तथापि, या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे अप्रत्यक्ष संकेतही दिले. (Election 2024)

विशेष म्हणजे केंद्रीय नेतृत्व या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे. ‘द हिंदू’ने केंद्रीय मंत्र्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले. (Election 2024)

सरकारचा प्रभाव पडण्यास वेळ (Election 2024)

महाराष्ट्र भाजपच्या या अहवालानुसार, शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचा प्रभाव दिसून येईपर्यंत बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे या प्रभावातून केवळ राज्य सरकारच्या कामगिरीवर निवडणुका जिंकणे हे आव्हानात्मक ठरू शकते. कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हवाल्याने ‘द हिंदू’ने हे वृत्त दिले, हे मात्र सांगितले नाही.

…तर ‘मविआ’त फूट शक्य

‘मविआ’तील घटक पक्षांमध्ये जागा वाटप, प्रचाराचे मुद्दे आणि इतर काही कारणांमुळे फूट पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचा गट सध्या दुबळा आहे. काँग्रेसला अद्यापही सूर गवसला नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्याच उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करतील. त्यामुळे भाजपला फायदा होईल.

निवडणूक आयोगाचीही तयारी

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यास त्यासाठी आमची तयारी आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनीही सांगितले.
भाजपचा अप्रत्यक्ष स्वबळाचा नारा
भाजपचे विधानसभेत 105 आमदार असून आठ अपक्ष सोबत असल्याने एकूण संख्या 113 बनते. भाजप 60 मतदारसंघांत काहीवेळा हरला किंवा जिंकला आहे. अशा जागांची संख्या 173 आहे. शिंदे गटाकडे असलेले 12 मतदारसंघ सोडले तरी भाजपला जिंकण्यासाठी आणखी 8 टक्के मतांची गरज आहे. भाजपकडे 43 टक्के मते आहेत.

अधिक वाचा :

Back to top button