Stock Market Opening | सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढून ५८ हजारांवर, ‘हे’ स्टॉक्स तेजीत | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढून ५८ हजारांवर, 'हे' स्टॉक्स तेजीत

Stock Market Opening : जागतिक सकारात्मक संकेतांच्या जोरावर शेअर बाजाराने आज शुक्रवारी (दि.१७) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० हून अधिक वाढून ५८ हजारांवर गेला. तर निफ्टी १७,१०० वर होता. बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आज तेजीत आहेत. निफ्टी मेटल १.२५ टक्क्यांने आणि निफ्टी आयटी ०.९८ टक्क्यांने वाढला. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, रियल्टी, कन्झूंमर ड्यूरेबल्स, ऑईल आणि गॅस हेदेखील आज वधारले आहेत.

सेन्सेक्सवर इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टाटा मोटर्स हे शेअर्स १.५ टक्क्यांपर्यंत वाढले. अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, टाटा स्टील, एचडीएफसी आणि विप्रो हेदेखील वाढले आहेत. दरम्यान, भारतीय एअरटेल, टीसीएस आणि सन फार्मा हे घसरले. TCS चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याचे शेअर्स किरकोळ घसरले. (Stock Market Opening)

अमेरिका आणि आशियाई बाजारातील शेअर्स वाढले आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २२ पैशांनी वाढून ८२.५४ वर पोहोचला.

हे ही वाचा :

Back to top button