Sanjay Raut : नागालँडमध्ये यापूर्वीही एकत्रित सरकारचा प्रयोग- खासदार संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : नागालँडमध्ये यापूर्वीही एकत्रित सरकारचा प्रयोग- खासदार संजय राऊत

पुढारी ऑनलाईन: Sanjay Raut : नागालँड हे भौगोलिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू काश्मीर पेक्षाही संवेदनशिल राज्य आहे. सध्या अस्तित्वात आलेल्या सरकारला राष्ट्रवादी आणि जनता दलाने पाठिंबा दिला हे खरे आहे. पण हे काही आत्ताच होतय असे नाही, यापूर्वी देखील येथील परिस्थितीनुसार आणि जनतेच्या हितासाठी नागालँडमध्ये अनेकवेळा एकत्रित पक्षाचा प्रयोग झाला आहे. सीमावर्ती राज्य असल्याने नागालँडमध्ये राजकीय एकात्मता असणे गरजेचे असल्याचेही ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सध्या नागालँडमध्ये केवळ भाजपचे सरकार नाही. तर याठिकाणच्या स्थानिक पक्षाच्या सरकारमध्ये भाजप सहभागी झाला आहे. येथील भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीमुळे या सरकारला राष्ट्रवादी आणि जनता पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. पण हे लोकांपर्यंत पोहचविण्यास राष्ट्रवादी कमी पडत असल्याचेही संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

भाजपने स्वार्थासाठी प्रखर हिंदुत्त्ववादी पक्ष तोडला. महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा बाण आहे. जनता ही गोष्ट कधीच विसरणार नाही. बाळासाहेबांची मूळ शिवसेना ही जाग्यावरच आहे. हे जनताच दाखवून देईल असे वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केले आहे.

हेही वाचा:

Back to top button