मुंबई : आंदोलनातून घरी परतताना दोन शिक्षकांचा मृत्यू | पुढारी

मुंबई : आंदोलनातून घरी परतताना दोन शिक्षकांचा मृत्यू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती 165 आश्रम शाळांमधील वेतन श्रेणी व विविध मागणीच्या संदर्भात गेली 43 दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातील दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंदोलनकर्ते सुनील शिंदे आणि फरीद शेख (दोघेही नांदेड) आंदोलनातून (२० दिवस सहभाग घेऊन) दोन दिवसांसाठी गावी गेल्यानंतर एकाच गाडीवर दोघेही प्रवास करत असताना अचानकपणे एकास हार्ट अटॅक आल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला उलटली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हे दोघेही आंदोलनकर्ते एकाच गावातील एकाच आश्रम शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. यामधील एका आंदोलनकर्त्याचा गेल्या वर्षीच विवाह झाला होता. आणि दुसऱ्या आंदोलनकर्त्याचा अजून विवाह देखील झालेला नव्हता. वेतन श्रेणीचा निकाल शासनाकडून मार्गी लागल्यानंतर विवाह करण्याचे त्यांचे ठरले होते. त्यांच्या या आकस्मित निधनाची बातमी आझाद मैदानावर कळताच आझाद मैदानावरील आंदोलनकर्ते शोकाकुल झाले.

शिंदे व शेख यांना बेमुदत उपोषणास बसलेल्या निवासी आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी आझाद मैदानात श्रद्धांजली वाहण्यात आली.

हेही वाचा

Back to top button