मुंबई : पत्र लिहून कोणाचीही सुटका होणार नाही, यावर उपाय एकच…; फडणवीसांचा विरोधकांना सल्ला | पुढारी

मुंबई : पत्र लिहून कोणाचीही सुटका होणार नाही, यावर उपाय एकच...; फडणवीसांचा विरोधकांना सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव आणत आहे, देश हुकुमशाहीच्या दिशेने जात आहे, अशा आरोपाचे पत्र विरोधी पक्षातील नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिले आहे. यावर भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तपास यंत्रणांमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही. त्यामुळे असे पत्र लिहून कोणाचीही सुटका होणार नाही. याच्यावर उपाय एकच आहे की, गैरमार्गाने, भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा बंद केला पाहिजे,”असे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपमध्ये येणाऱ्यांची चौकशी बंद होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षातील नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तपास यंत्रणांमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही. त्यामुळे असे पत्र लिहून कोणाचीही सुटका होणार नाही. भारतीय जनता पक्षात कोणी आलं म्हणून चौकशी बंद झाली, असं विरोधकांनी उदाहरण दाखवावं. भारतीय जनता पक्षात असा किंवा कुठेही असा ज्यांनी चूक केली असेल त्यांची चौकशी होईल. एखाद्यावर चुकीची कारवाई झाली असेल तर त्यासाठी न्यायालय आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button