‘तो’ अधिकार निवडणूक आयोगाला नाही : संजय राऊत | पुढारी

'तो' अधिकार निवडणूक आयोगाला नाही : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवगर्जना यात्रेत लोकांचा प्रचंड सहभाग आहे. शिवसेनेतून फुटून गेलेल्यांमुळे काहीही परिणाम झाला नाही. कागदावर नाव आणि चिन्ह मिळालं पण शिवसेनेच्या जनतेच प्रेम मिळणार नाही. जनता आणि शिवसेनेला सुपूर्द करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही, त्यामुळे कागदावरचा निर्णय कागदावरच राहील, जनमताचा पाठींबा उद्धव ठाकरेंना आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा आज कोकणात खेड येथे होणार आहे. ही सभा अतिविराट होणार असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. शिवगर्जना संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. यात लोकांचा प्रचंड सहभाग आहे. आजच्या खेडच्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कोकणातील आजची सभा विराट होईल. कोकणचे शिवसेनेच्या वाढीमध्ये आणि संघर्षामध्ये सुरूवातीपासून मोठे योगदान आहे. यानंतरची दुसरी सभा मालेगावला होईल, त्या सभेची तयारी सुरू आहे. निघून गेलेल्यांमुळे शिवसेनेवर काहीही परिणाम झाला नाही. कागदावर नाव आणि चिन्ह मिळालं पण शिवसेनेच्या जनतेच प्रेम मिळणार नाही. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही, जनता आणि शिवसेनेला सुपूर्द करण्याचा. त्यामुळे कागदावरचा निर्णय कागदावरच राहील. शिवगर्जना यात्रेमुळे शिंदे गट हादरला आहे. कागदावर चिन्ह आलं असलं तरी जनमताचा पाठींबा उद्धव ठाकरेंना आहे, असे ते म्हणाले.

देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना टार्गेट केलं जात आहे. त्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवावा आणि केंद्रापर्यंत न्यावा हे ठरले आहे. पंतप्रधान हे घटनात्मक पदावर असल्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका बजावली असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button