Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडेवर हल्ला करणारे सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपींना पकडण्यासाठी ८ पथक तैनात
मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल (शुक्रवार,दि.३) सकाळी मॉर्निंग वॉक करताना हल्ला झाला. सध्या त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ४ अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद्य झाले आहे. या फुटेजमध्ये एक आरोपी हातात स्टंप घेऊन जाताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी आठ पथकं तैनात केली आहेत. वाचा सविस्तर बातमी (Sandeep Deshpande Attack )
Sandeep Deshpande Attack : लोखंडी रॉड आणि स्टंम्पने मारहाण
मनसे नेते संदीप देशापांडे शिवाजी पार्कात नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी त्यांच्यावर तोंडाला मास्क लावून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत लोखंडी रॉड आणि स्टंम्पने मारहाण केली. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. ही घटना काल (शुक्रवार,दि.३) घडली आहे. अचानक हा हल्ला झाल्याने वेसावध देशपांडे या हल्ल्यात जखमी झाले. यावेळी शिवाजी पार्कात मॉर्निंग वाकला आलेल्या लोकांनी त्यांना हल्लेखोरांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोर तेथून पसार झाले. यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल केले. अजुनही संदीप देशपांडे यांच्यावर अजून उपचार सुरु आहेत.
हेही वाचा
- Sonia Gandhi Health Update : सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल
- Ales Bialiatski : नोबेल शांतता पुरस्कार विजेत एलेस बियालियात्स्की यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा; जाणून घ्या काय आहे कारण
- पिंपरी : …अन् डोळ्यांत तरळले अश्रू
- Vijayapriya Nithyananda : कोण आहे 'कैलासा'ची विजयप्रिया नित्यानंद? UN मध्ये ओकली भारताविरुद्ध गरळ

