संजय राऊत अडचणीत?, भाजपकडून हक्कभंग प्रस्ताव दाखल | पुढारी

संजय राऊत अडचणीत?, भाजपकडून हक्कभंग प्रस्ताव दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदार संजय राऊत यांना ‘महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ’ असं वक्तव्य केलं होतं. पण या वक्तव्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपने या वक्तव्याची गंभीर दखल घेत राऊतांविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत ही चौकशी पूर्ण करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाच्या नोटीसवर ८ मार्च रोजी राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत.

संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेना आमदारांनी विधीमंडळात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हक्कभंग प्रस्ताव दाखल संदर्भात प्रतोद भरत गोगावले म्हणाले- संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. ते रोज पुस्तकातून नवे शब्द शोधून काढतात. काहीतरी भडक बोलल्याशिवाय त्यांच्या बातम्याच होत नाहीत. पण लोक आता त्यांना कंटाळले आहेत.

 

Back to top button