सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकायुक्त कायदा पास करावा : देवेंद्र फडणवीस | पुढारी

सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकायुक्त कायदा पास करावा : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (दि.२७) सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकायुक्त कायदा पास करावा, असे आवाहन केले.

या वेळी फडणवीस म्हणाले की, लोकायुक्त कायद्यामुळे पारदर्शकता येणार आहे. सर्व पक्षांनी लोकायुक्त कायद्याला मदत करावी. विरोधकांनी लोकायुक्त बिल पास करण्यासाठी येकत्र यावं. एकमताने या कायद्याला पारित करावे, असे आवाहन त्यांनी केले. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

कांदा उत्पादकांवर बोलत असताना फडणवीस म्हणाले की, कांदा उत्‍पादक शेतकरी आज संकटात आहे. कमी प्रतीच्या कांद्यातून वाहतुकीचा खर्च वजा करता येत नाही. कांदा निर्यात होणाऱ्या तिन्‍ही देशांमध्‍ये परकीय चलनात तूट निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांनी सूर्या ट्रेडिंग कंपनीचा परवाना रद्द करण्यात येणार, अशी माहिती दिली.

कुणीतरी शाईफेक करणार, अशी माहिती संजय राऊत यांनी जबाबात दिली. राऊत हे कधी कधी सनसनाटी निर्माण करणारी वक्तव्ये करतात, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button