विचारधारेशी कटीबद्ध असलेले नेतृत्व काळाच्या पडद्याआड: अशोक चव्हाण यांची डॉ. देवीसिंह शेखावत यांना श्रद्धांजली | पुढारी

विचारधारेशी कटीबद्ध असलेले नेतृत्व काळाच्या पडद्याआड: अशोक चव्हाण यांची डॉ. देवीसिंह शेखावत यांना श्रद्धांजली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अमरावती महानगरपालिकेचे प्रथम महापौर, माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ, निष्ठावान आणि विचारधारेशी कटीबद्ध असे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, अशा शब्दांत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

शिक्षणाविषयी त्यांना प्रचंड तळमळ होती. अमरावती येथे देशातील पहिले नवोदय विद्यालय तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. विद्याभारती शैक्षणिक मंडळाच्या रूपात त्यांनी एक दर्जेदार शिक्षण संस्था उभी केली. अतिशय मितभाषी व सहकार्यासाठी नेहमी तत्पर असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाचे मला तीव्र दुःख आहे. डॉ. देवीसिंहजी शेखावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

हेही वाचा 

Back to top button