नाव, चिन्हासाठी सौदा; पैसा शिंदे गटाचा आणि यंत्रणा भाजपची : संजय राऊत यांचा आरोप | पुढारी

नाव, चिन्हासाठी सौदा; पैसा शिंदे गटाचा आणि यंत्रणा भाजपची : संजय राऊत यांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील स्वायंत्त संस्था सत्ताधारी पक्षाच्या गुलाम बनल्या आहेत. न्याय आणि निर्णय यात फरक आहे. आमची लढाई देश हुकुमशाहीकडे नेणाऱ्या भाजपशी आहे. शिंदे गट त्यांचा गुलाम आहे, आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रता नाही. पैसा शिंदे गटाचा आणि यंत्रणा भाजपची अशा पद्धतीने न्याय विकत घेतला, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. आज (दि.२०) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे दिल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. चिन्ह आणि नावासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप केल्यानंतर राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना चिन्ह आणि नावाचा निर्णय विकत घेण्यात आला असून त्याचे पुरावे लवकरच देऊ असे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, देशाला सत्य आणि न्यायाची बाजू डावलली जाते हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार आयोगाच्या निर्णया आधीच निर्णय काय येणार हे सांगत होते. न्याय आणि निर्णय यात फरक आहे. प्रचंड पैशाचा वापर करून निर्णय घेतला. आमची लढाई देश हुकुमशाहीकडे नेणाऱ्या भाजपशी आहे, शिंदे गट त्यांचा गुलाम आहे. आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही. पैसा शिंदे गटाचा आणि यंत्रणा भाजपची अशा पद्धतीने न्याय विकत घेतला. काही व्यापाऱ्यांना महाराष्ट्र आणि मुंबई ताब्यात घ्यायची आहे, पण शिवसेना हा त्यांच्या मार्गातील प्रमुख अडथळा आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

हेही वाचा :

Back to top button