Share Market opening | आयटी स्टॉक्स आघाडीवर, अदानींच्या शेअर्सची संमिश्र कामगिरी | पुढारी

Share Market opening | आयटी स्टॉक्स आघाडीवर, अदानींच्या शेअर्सची संमिश्र कामगिरी

Share Market opening : शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज सोमवारी (दि.२०) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० अंकांनी वाढला. तर निफ्टी १८ हजारांजवळ होता. क्षेत्रीय निर्देशांकांत आयटी स्टॉक्स आघाडीवर आहेत. सर्व आयटी शेअर्स वधारले आहेत. सेन्सेक्सवर भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी आणि पॉवर ग्रिड हे टॉप गेनर्स आहेत. तर नेस्ले इंडिया, विप्रो, टाटा स्टील, टीसीएस आणि बजाज फायनान्स यांचे शेअर्स घसरले.

दरम्यान, आजच्या व्यवहारात अदानी समूहातील शेअर्स संमिश्र व्यवहार करताना दिसत आहेत. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ४.११ टक्क्याने खाली आला आहे. तर अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अंबुजा सिमेंट, एनडीटीव्ही या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. (Share Market opening)

NSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी ६२४.६१ कोटी रुपयांचे शेअर्स तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ८५.२९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. या महिन्यात १७ फेब्रुवारीपर्यंत FII ने १,४०८.३६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर DII ने ९,१८८.१५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

 हे ही वाचा :

Back to top button