नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत मंगळवारी (दि. १४) नाशिकमध्ये येत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ते नाशिकमधील शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. भाजप तसेच पायउतार झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ते काय तोंडसुख घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचप्रमाणे पक्षाचे उपनेते सुनील बागूल यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यासही ते हजेरी लावणार आहेत.
खा. संजय राऊत हे पक्षावर होणारे वार झेलून सर्वांना सडेतोड उत्तरे देणाऱ्या कणखर नेत्यांपैकी एक असल्याने त्यांचे पक्षात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पक्षाची नव्याने बांधणी करण्यात खा. राऊत सध्या व्यग्र असून, मोठ्या प्रमाणात लोक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. यात खा. राऊत यांचे योगदान मोलाचे आहे. खा. राऊत यांचे मंगळवारी (दि. 14) दुपारी ४ वाजता पाथर्डी फाटा येथे आगमन होईल. तेथे पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. सायंकाळी ७ वाजता ते रामवाडी पंचवटी येथे शिवसेना उपनेते सुनील बागूल यांच्या अभीष्टचितंन सोहळ्यास उपस्थित राहतील. सुनील बागूल यांनी शिवसेनेच्या बळकटीसाठी तसेच जिल्ह्यात पक्षाच्या ठिकठिकाणी शाखा उघडण्यास मोलाचे योगदान दिले आहे. गद्दारांनी शिवसेना सोडल्यानंतर आता बागूल यांच्यावर मोठी जबाबदारी आली असून, त्याला ते योग्य न्याय देत आहेत. त्यामुळे त्यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यास खा. राऊत यांची उपस्थिती हा त्यांचा एकप्रकारे गौरवच म्हणावा लागेल.
खा. राऊत यांचा दौरा यशस्वी करण्यास माजी मंत्री व उपनेते बबनराव घोलप, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, कृणाल दराडे, आ. नरेंद्र दराडे, विनायक पांडे, माजी आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, अनिल कदम, वसंत गिते, निर्मला गावित, मनपा माजी गटनेते विलास शिंदे, युवासेना जिल्हाध्यक्ष दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, सचिन मराठे, महेश बडवे, शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ आदी प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा :