State Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार राज्य गीताने | पुढारी

State Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार राज्य गीताने

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताची धून वाजवली जाणार आहे. (State Budget Session)

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर तर विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आज (दि.८) झाली. या बैठकीत विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाचा प्रारंभ २७ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.

State Budget Session : ८ मार्च रोजी दोन्ही सभागृहांमध्‍ये विशेष चर्चा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त) ५ आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित) ८ अशी अंदाजे १३ विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button