Alankar Sawai : राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अलंकार सवाई यांची ईडीकडून चौकशी | पुढारी

Alankar Sawai : राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अलंकार सवाई यांची ईडीकडून चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लाँड्रिंग प्रकरणात (Alankar Sawai) काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अलंकार सवाई यांची ईडीने चौकशी केली. आणि त्यांचे जबाब नोंदवले. तर या प्रकरणी टीएमसीचे प्रवक्ते साकेत गोखले यांना नुकतीच गुजरातमध्ये अटक केली होती.

याबाबत (Alankar Sawai) एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सवाई यांची चौकशी करण्यात आली आहे. सवाई माजी बँकर असून राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी मानले जातात. ते त्यांच्या संशोधन पथकाचे नेतृत्व करत असल्याचे सांगितले जात आहे.

क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे निधी उभारण्यात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. तर २५ जानेवारी रोजी सवाई यांना अटक केली आहे. तर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) साकेत गोखलेच्या कोठडीची मागणी अहमदाबादच्या न्यायालयाकडे केली. ईडीने न्यायालयाला सांगितले की, एका वर्षात गोखले यांच्या बँक खात्यात २३.५४ लाख रुपये रोख रक्कम जमा झाले आहेत. त्याबद्दल विचारले असता, गोखले यांनी सांगितले की, अलंकार सवाई यांनी रोख रक्कम दिली होती.

सवाई याने त्यांना रोख रक्कम का दिली, असे विचारले असता गोखले यांनी सांगितले की, केवळ सवाईच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. सवाई यांच्याशी सोशल मीडियाच्या कामाबाबत लेखी करार केल्याबद्दल विचारले असता, त्यांनी अलंकार सवाई यांच्याशी केवळ तोंडी करार केल्याचे सांगितले. दरम्यान, गोखले तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सदस्य असताना या रोख ठेवी त्यांना मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button