

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय अयोग्य असल्याचे म्हटलं. आयोगान घटनाक्रमाला धरून निर्णय दिला नाही. आज सर्वात वादग्रस्त निवडणूक अधिकारी पदावर असल्याची टीका त्यांनी केली. हा निर्णय देण्यासाठी निवडणूक आयोगाला इतकी घाई का झाली होती असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत असला निवडणूक अयोग बरखास्त झाला पाहिजे असे ते म्हणाले. शिवसेना संपवायचा हा प्लॅन असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पक्षाचा नाव आणि चिन्ह चोरलं तरी ठाकरे नाव चोरू शकणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
आजच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसले. यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी ठाकरे यांनी भविष्यात ठाकरे गटाच्या केसेसही बाहेर पडतील. चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू आहे. त्यांनी आमचं चिन्ह चोरलं पक्ष चोरला आमचे वडीलही चोरण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे. हे जे सर्व चाललं आहे ते शिवसेना संपवायची त्यांची इच्छा आहे. पण ती पूर्ण होणार नाही. त्यांनी शिवसेना संपवायची सुपारी घेतली असत्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरण हा त्यांचा पूर्वनियोजित कट होता.
त्यामुळे आज जे शिवसेनेसोबत झालं आहे ते देशातल्या इतर पक्षांसोबतही होउ शकतं. त्यामुळे जागे व्हा नाहीतर २०२४ ची शेवटची निवडणूक ठरेल आणि देशात हुकुमशाही येईल अशी टीका त्यांनी केली. दरम्यान गुंतावा वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने हा घाईने निर्णय दिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
हेही वाचा :