आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ; शिवसंवाद यात्रेत असणार अतिरिक्त पोलिस बंदोबस्त | पुढारी

आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ; शिवसंवाद यात्रेत असणार अतिरिक्त पोलिस बंदोबस्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी (दि.०८) औरंगाबादमधील महालगाव येथे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान वाद झाला होता. त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

शिवसंवाद यात्रेनिमित्त मंगळवारी सायंकाळच्या सुमारास महालगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी, गावातील तरुणांनी रमाई जयंतीनिमित्त मिरवणूक काढली होती. त्यावेळी वाद झाला होता. आदित्य ठाकरेंची सभा उधळली गेल्याने त्यांना तेथून काढता पाय घेण्याची नामुष्की ओढवली गेली. एवढेच नव्हे, तर ते सभेसाठी आले असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे आता यापुढे शिवसंवाद यात्रेदरम्यान खबरदारी म्हणून अतिरीक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button