माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी : रामदास आठवले | पुढारी

माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी : रामदास आठवले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला एकनिष्ठपणे समर्पित केले. सत्ता मिळो अथवा न मिळो, त्यांनी रिपब्लिकन ही ओळख कायम जोपासली. त्यांनी कधीही रिपब्लिकन चळवळ सोडली नाही. रिपब्लिकन ऐक्यासाठी ते नेहमीच आग्रही होते. माझ्या नेतृत्वाला त्यांनी एकनिष्ठपणे साथ दिली होती. त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीने ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व गमावले, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आंबेडकरी चळवळीतील माजी मंत्री अविनाश महातेकर, चंद्रकांत हंडोरे, अर्जुन डांगळे, नानासाहेब इंदीसे, गौतम सोनवणे, राम पंडागळे, काकासाहेब खंबाळकर, सुरेश बारशिंग,  सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड, तानसेन ननावरे, दिलीप जगताप, पप्पू कागदे, अॅड. गुणरतन  सदावर्ते, जयश्री पाटील, सिद्धार्थ कासारे, महेश खरे, सिद्राम ओहोळ, श्रीकांत भालेराव, बाळासाहेब मिरजे, दयाळ बहादूर, असित गांगुर्डे, संगीत आठवले, शशिकला जाधव, चंद्रशेखर कांबळे, सोना कांबळे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांचे गुरूवारी (दि. २६) सकाळी मुंबईत केईएम हॉस्पिटल येथे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर रात्री तुर्भे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button