‘त्या’ महिलेच्या सर्व पोस्ट हटवा: राहुल शेवाळेंची हायकोर्टात धाव | पुढारी

'त्या' महिलेच्या सर्व पोस्ट हटवा: राहुल शेवाळेंची हायकोर्टात धाव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा:  प्रेमसंबंधाबरोबरच बलात्काराचा गंभीर आरोप महिलेच्या सोशल मीडियावरील पोस्ट तत्काळ हटवा आणि तिचे ट्विटर अकाउंट कायमचे बंद करा अथवा याचिकेवरील निर्णय होईपर्यंत स्थगित करा, अशी विनंती करत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. या महिलेच्या आरोपांवरुन शेवाळेंवर गुन्हे दाखल झाले असले तरी कारवाई झालेली नाही. असे असताना हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही चर्चा नको म्हणून शेवाळेंनी या याचिकेत सोशल मीडिया ट्विटर इंडिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनलाही प्रतिवादी केले आहे.

हेही वाचा

Back to top button