गँगस्टर छोटा राजनचा वाढदिवस करणे आले अंगलट; पोलिसांनी ठोकल्या बेड्या | पुढारी

गँगस्टर छोटा राजनचा वाढदिवस करणे आले अंगलट; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढारी ऑनलाईन : कुख्यात गँगस्टर  छोटा राजन याचा वाढदिवस साजरा करणे त्‍याच्‍या मित्राला चांगलच अंगलट आले. मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत छोटा राजनच्‍या वाढदिवसाचे बॅनर हटवले. तसेच आरोपी आणि छोटा राजनचा जवळचा साथीदार निलेश पराडकर याला अटकही केली.

आरोपी निलेश हा गँगस्टर छोटा राजनचा साथीदार आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्याला चेंबूर परिसरातून ताब्यात घेतले. संबंधित प्रकरणानंतर त्याच्यावर  आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज  सकाळी न्यायालयात हजर करण्यात आल्‍याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

आरोपी निलेश पराडकरला भोईवाडा न्यायालयात हजर करण्‍यात आले. न्यायालयाने त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचुकल्‍यावर जामीन मंजूर केला. पराडकर याने पुढील सात दिवस टिळकनगर पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी, पासपोर्ट जमा करावा, असे आदेशही न्‍यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा:

Back to top button