‘ईडी’च्या कारवाईमागे ‘राजकीय रंगा’चा संशय : अजित पवार | पुढारी

'ईडी'च्या कारवाईमागे 'राजकीय रंगा'चा संशय : अजित पवार

पुढारी ऑनलाईन : राज्य आणि केंद्रात कोणतेही सरकार असो; पण सत्तेतील सरकारने सूडबुद्धीने वागू नये. ‘ईडी’च्या प्रत्येक कारवाईमागे राजकीय रंगाचा संशय असल्याचे वाटते, असा आरोप  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज ( दि. ११ ) केला. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (कोल्हापूर) आणि पुणे येथील घरांवर ईडीने छापे टाकले.  यावर बोलताना अजित पवार म्हणाले, सक्तवसुली संचालनालयाला ( ईडी ) चौकशीचा पूर्ण अधिकार; पण ठराविक पक्षातील, ठराविक व्यक्तींवर अशी कारवाई करणे चुकीचे आहे. सत्तेतील सरकार ‘ईडी’ यंत्रणेला हाताशी धरून जाणून बुजून कारवाई करत आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

सत्ता कोणाचीही असो, राजकीय द्वेषातून कोणीच वागू नये. कोणत्याही राजकीय नेत्यावर सूडबुद्धीने कारवाई करणे चुकीचे. अनिल देशमुखांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत; पण चौकशीला सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र याचा नाहक त्रास संबंधित नेत्याच्या कुटुंबाला होत असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button