Jayant Patil Tweet : ‘हा निव्वळ योगायोग समजावा…’ : जयंत पाटील यांचे ट्विट चर्चेत | पुढारी

Jayant Patil Tweet : 'हा निव्वळ योगायोग समजावा...' : जयंत पाटील यांचे ट्विट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : जून २०२२ मध्‍ये राज्‍यात सत्तांतर झाले. तेव्‍हापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारला टोला मारला आहे. या ट्विटवर सोशल मीडियासह राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागल्या आहेत. (Jayant Patil Tweet)

शिवसेनेतील फूट त्यानंतर शिंदे-फडणवीस युती सरकार आलं. एकीकडे राज्‍यात राजकीय नाट्यावर पडदा पडल्‍यानंतर महाराष्ट्रात येणारे  काही  प्रकल्प गुजरातकडे गेले. यावरुन विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. याच मुद्‍यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही ट्विट करत महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातकडे जात आहेत यावरुन शिंदे आणि फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

Jayant Patil Tweet : “निव्वळ योगायोग समजावा”

जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर “फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा! ” असं लिहीत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोन जाहिराती आणि एक होर्डींग दिसत आहे. दोन डिलिव्हरी कंपनीच्या जाहिराती या फोटोत दिसत आहेत. या फोटोमध्‍ये  ब्लिंकीट कंपनीच्या जाहीरात बॅनवर”दूध मांगोगे तो दूध देंगे” असे लिहलं आहे. त्याच शेजारी झोमॅटो कंपनीची बॅनवर “खीर मांगोगे तो खीर देंगे” असे लिहिले आहे. या दोन कंपन्यांच्या जाहीरातीमध्ये  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोटो असलेले एक हॉर्डिंगही दिसत आहे. यावर लिहलं आहे
की,” इंनवेसमेंट मांगोगे युपी, गुजरात को देंगे,”

हा फोटो शेअर करत जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. आता जयंत पाटील यांच्‍या फोटो ट्विटवर शिंदे-फडणवीस सरकारची काय प्रतिक्रिया येणार, याकडे राजकीय वर्तुळचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा

Back to top button