ठाकरे गट-प्रकाश आंबेडकर यांच्यातील चर्चेची मविआ नेत्यांना माहिती : संजय राऊत | पुढारी

ठाकरे गट-प्रकाश आंबेडकर यांच्यातील चर्चेची मविआ नेत्यांना माहिती : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना आहे. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेतील चर्चेची अधिकृत माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिली आहे. दिल्लीत आणि महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले सत्ताकारण उठवायचं असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणे गरजेचे आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबई येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माननारी शक्ती प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे. प्रकाश आंबेडकर यांचे संघटन सोबत आले तर महारष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल. कालचे प्रकाश आंबेडकर यांचे भाष्य सकारात्मक आहे. शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र यावी ही आमची इच्छा होती. शिवशक्ती आणि भीमशक्ती महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे. सध्याचे दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्ताकारण सुरू आहे ते उठवायचं असेल तर या दोन शक्ती एकत्र येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

मंत्री दीपक केसरकर यांनी राऊत यांनी पुन्हा एकदा जेल मध्ये जाण्याची तयारी करावी, असे भाकीत केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, पक्षासाठी जेलमध्येही जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे लफंगे, पळकुटे नाही. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही, कायदा नाही. २०२४ साली त्यांनीही तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button