पंढरपूरजवळ लॉजवर वेश्या व्यवसाय; लॉजमालकावर पोलीसांत गुन्हा दाखल - पुढारी

पंढरपूरजवळ लॉजवर वेश्या व्यवसाय; लॉजमालकावर पोलीसांत गुन्हा दाखल

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरजवळ लॉजवर वेश्या व्यवसाय :  पंढरपूरजवळ पंढरपूर ते सांगोला रोडवर असलेल्या हॉटेल आनंद लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलीसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे.

या छाप्यात पोलीसांनी तीन महिलांची सुटका केली. लॉज मालकावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. ही घटना दि. 22 रोजी रात्री घडली आहे. या कारवाईमूळे पंढरपूरात एकच खळबळ उडाली असून लॉज चालकांचे धाबे दणाणले आहेत.

पंढरपूरजवळ लॉजवर वेश्या व्यवसाय

याबाबत पंढरपूर तालूका पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर ते सांगोला रोडवर असलेल्या हॉटेल आनंद येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली होती.

त्यानुसार दि. 22 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालूका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या पथकाने लॉजवर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. खात्री होताच शासकीय पंच, खासगी पंटरसह पोलीसांनी कारवाई करत लॉजमध्ये कारवाईवेळी मिळून आलेल्या तीन महिलांची सुटका केली आहे.

या महिलांकडून हॉटेल मालक लक्ष्मण वसंत चौगुले (वय 60) रा. संभाजी चौक पंढरपूर, हा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या महिलांकडून जबरदस्तीने वेशा व्यावसाय करुन घेत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी हॉटेल मालक लक्ष्मण चौगुले याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. तर तीन महिलांची सुटका केली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button